मुंबईच्या खड्‌ड्यांबाबत जयंत पाटील पालिकेवर नाराज

August 10, 2010 1:10 PM0 commentsViews: 3

10 ऑगस्ट

मुंबईतील खड्‌डयाची परिस्थिती दाखवण्याकरिता खुद्द मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी महानगरपालिकेचे ऍडिशनल कमिशनर असिम गुप्ता यांना गाडीत बसवून मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे दाखवले.

दहा दिवसांपूर्वी मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन मनपाने पालकमंत्र्यांना दिलं होतं, पण प्रत्यक्षात अजूनही मुंबईच्या रस्त्यावर खड्डे असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर निकृष्ठ काम करणार्‍या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याबाबत मनपानं कठोर भूमिका घ्याव्या अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहे.

close