कलमाडींनी राजीनामा द्यावा : दिग्विजय सिंग यांची मागणी

August 10, 2010 1:20 PM0 commentsViews: 2

10 ऑगस्ट

काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग देव यांनी कलमाडी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कलमाडी यांच्याविरु द्ध सीबीआयने केस दाखल केल्यास त्यांनी राजीनामा द्यावा असं दिग्विजय सिंग देव यांनी म्हटलंय. उत्तर प्रदेशातल्या सहारनपुर मध्ये त्यांनी ही मागणी केली.

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी आता प्रयत्न चौघांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र काँग्रेस पक्षाच्या एका जबाबदार नेत्याने ही मागणी केल्यानं या मागणीला काँग्रेस हायकमांडचा पाठिंबा असल्याचं बोललं जातंय. दरम्यान कलमाडी यांनी याप्रकरणी आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी सर्व खासदारांना एक पत्र पाठवलंय. कॉमनवेल्थ प्रकरणी आपण कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

close