तेजस्विनी सावंतचं घरी जंगी स्वागत, हत्तीवरुन काढली मिरवणूक

August 10, 2010 5:17 PM0 commentsViews: 6

10 ऑगस्ट

जागतिक नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात सुवर्णपदकांसह विश्वविक्रमाशी बरोबरी करणार्‍या तेजस्विनीच्या कामगिरीमुळं कोल्हापूरकर जाम खुश झाले आहेत. कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराजवळ तिच्या नातेवाईकांनी तिचं स्वागत केलं आहे. यावेळी भाजपाचे आमदार चंद्रकांत पाटील,आमदार महादेवराव महाडीक यांनीही तेजस्विनीच्या कामगिरीचं कौतुक करुन तिचं अभिनंदन केलं.

त्यानंतर तेजस्विनीनं महालक्ष्मी मंदिरात जावून महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतले.आणि त्यानंतर तमाम कोल्हापुरकरांनी तेजस्विनीची हत्तीवरुन सहवाद्य मिरवणूक काढली. ही मिरवणूक महालक्ष्मीमंदिरापासून महाद्वार रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका मार्गे शिवाजी चौकापर्यंत काढण्यात आली. दरम्यान तेजस्विनीची रथातून मिरवणूक काढली, हा रथ कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी चालविला. कोल्हापुरकराचं हे प्रेम बघुन तेजस्विनी खूपच खुश झाली.

close