राज्य आपत्ती व्यवस्थापन परिषदेची बैठक

August 11, 2010 3:18 PM0 commentsViews: 8

11 ऑगस्ट

मंगळवारी राज्य आपत्ती व्यवस्थापन परिषदेची बैठक पार पडली माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेची स्थापना झाली होती. या आपत्तीनंतर सरकारनं तातडीनं बैठक घेणं अपेक्षित होतं. पण ही बैठक दोन दिवसांनी झाली. सध्या मंुबईच्या समुद्रावर असलेलं, तेलसंकटापासून इतर संकटांचा मुकाबला करण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन परिषद स्थापन करण्यात आली होती.

तसेच 26/11 च्या हल्ल्यानंतर राज्य सुरक्षा परिषद स्थापन करण्यात आली होती. आता आलेल्या तेलसंकटा सारख्या संकटांचा सामना करतांना, कोस्टगार्ड किंवा अशा यंत्रणामध्ये समन्वय साधून, संकटाचा मुकाबला करण्यासाठी, राष्ट्रिय सुरक्षा परिषद स्थापन करण्यात आली. पण आतापर्यंत त्यांची फक्त एकच बैठक झाली. त्यामुळं सरकारने स्थापन केलेली परिषद फक्त नावापुरतीच आहेत का असा प्रश्न निर्माण झाला.

close