अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक 12 जखमी

August 11, 2010 4:42 PM0 commentsViews: 2

11 ऑगस्ट

पिंपरी-चिंचवड इथल्या प्राधिकरण भागातली अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर एका जमावाने दगडफेक केली. सुभाष चौधरी या बिल्डरचं बांधकाम पाडण्यासाठी प्राधिकरणाने नोटीस दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यासाठी आलेल्या पथकावर दगडफेक करण्यात आली. त्यात 3- 4 गाड्यांचे नुकसान करण्यात आल आहे. शिवाय 12 कर्मचारी जखमी झाले आहे. त्यांच्यावर पिंपरीतल्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिथे पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले.

close