राज्यावर H1N1चं संकट

August 12, 2010 11:57 AM0 commentsViews: 4

12 ऑगस्ट

पावसाळ्यात वाढणार्‍या साथीच्या आजाराने राज्यातल्या अनेक जिल्हात थैमान घातलेआहे. मलेरीया, गॅस्ट्रोच्या साथीने सरकारी दवाखाने रुग्णांनी खचुन भरली असताना आता H1N1चं संकट जाणवत आहे.

कोल्हापूरात H1N1 चे 15 बळी

कोल्हापूरात H1N1 ची अनेक रुग्णांना लागण झाली आहे. आता या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. जिल्हयात 1 जुलैपासून H1N1 मुळे 15 लोकांचा बळी गेला आहे. तर बुधवारी H1N1 च्या चार संशयित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे H1N1 ची भीती कोल्हापूरकरांच्या मनात बसली आहे. आत्तापर्यंत H1N1 चे 32 संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहे, त्यापैकी अनेकांना H1N1 ची लागण झाल्याचं तपासादरम्यान सिद्ध झालंय.

औरंगाबाद शहरात 13 बळी

औरंगाबाद शहर आणि आसपासच्या परिसरात अजूनही साथीच्या रोगांचे थैमान सुरुच आहे. H1N1 आणि काविळीची साथ शहरात पसरली असून दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गव्हर्नमेंट मेडीकल हॉस्पिटलमधील H1N1 च्या विशेष वार्डमध्ये उपचार घेणार्‍या तुळशीराम कळमकर आणि लता जाधव यांचा मृत्यु झाला. याच वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या H1N1 बाधित 13 जणांचा गेल्या 10 दिवसांमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच शहरातील पडेगाव इथल्या सालेहा हुसेन आणि कन्नड तालुक्यातील हिवरखेडाच्या रमा सुर्यवंशी या दोन महिलांचा काविळीनं मृत्यु झाला आहे.

रत्नागिरीत 12 संशयित

रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात H1N1 चा विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आहे. आत्तापर्यंत या वॉर्डमध्ये H1N1 च्या 12 संशयित रूग्णांना भरती करण्यात आली आहे. त्यातील 3 रूग्णांना H1N1 झाल्याचं तपासणीनंतर सिद्ध झाले आहे. त्यातील एकाला उपचारानंतर घरी पाठवले असून आणखी 4 संशयित रूग्णांची तपासणी आता करण्यात येणार आहे.

close