कॉमनवेल्थ आयोजनावर बाळासाहेबांची टीका

August 12, 2010 12:05 PM0 commentsViews: 5

12 ऑगस्ट

कॉमनवेल्थ गेम आयोजनवरुन बाळासाहेब ठाकरेंनी सुरेश कलमाडींवर कडाडून टीका केली. कलमाडींनी कॉमनवेल्थ आयोजनाचा सत्यानाश केल्याचं त्यांनी म्हटलंय. गोल्डनगर्ल तेजस्विनी सावंतनं बुधवारी शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांची भेट घेतली. तेजस्विनी सारख्या खेळाडूला प्रोत्साहन नाही द्यायचं तर कोणाला द्यायचं असा सवालही ठाकरे यांनी यावेळी केला.

कलमाडी शिवसेनेत आले होते. त्यावेळीही नीट वागायला सांगितलं होतं. मात्र कलमाडींनी शेवटी सेना सोडली आणि जे करायचं तेच केलं असा टोलाही बाळासाहेबांनी यावेळी लगावला.

close