छटपूजेत लाऊड स्पीकर लावपरण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी

October 24, 2008 1:08 PM0 commentsViews: 5

24 ऑक्टोबर, दिल्लीमुंबईतील सर्व चौपाट्यांवर छटपूजेच्या काळात रात्री दहा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास सुप्रीम कोर्टानं मंजुरी दिली आहे. छटपूजेदरम्यान लाऊडस्पीकर लावायला महाराष्ट्र सरकारनं बंदी घातली होती. या बंदीच्याविरोधात बिहारी फ्रंटनं सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. त्यावर सुप्रीम कोर्टानं बिहारी फ्रंटला दिलासा दिला आहे. चीफ जस्टीस के.जी.बालकृष्णन आणि जस्टीस पी. सत्थासिवम यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला.

close