‘पीपली लाईव्ह’ची रिलीजपूर्वी जोरदार कमाई

August 12, 2010 1:12 PM0 commentsViews: 3

12 ऑगस्ट

आमीर खान प्रोडक्शन निर्मित पिपली लाइव्ह शुक्रवारी पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपट भारतात जवळपास 600स्क्रिन्सवर हा रिलीज होत आहे. मात्र रिलीज होण्या अगोदरच सॅटेलाईट आणि म्युझिक राईटसमधून तब्बल 14 कोटी कमावले आहे. पिपली लाइव्ह हा चित्रपट सुरुवातीला फक्त 200 स्क्रिन्सवरचं पिपली लाइव्ह झळकणार असल्याचे आमीरने एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले होते पण त्यानंतर सिनमाचे प्रोमोज्, प्रमोशनला मिळत असलेल्या रिस्पॉन्सवरून पिपली लाइव्ह मोठ्या प्रमाणावर रिलीज करायचा निर्णय घेण्यात आला आहे.

अनुषा रिझवी दिग्दर्शित पिपली लाइव्ह या सिनेमात मणिकपूरी, रघुवीर यादव,मलाइका शेणॉय,फारूख जफ्फर,शालिनी वत्सा,नवाझुद्दीन सिद्दीकीस, आणि विशाल शर्मा ही या सिनेमाची स्टार कास्ट आहे. पिपली लाइव्हचं बजेट सुमारे 10 करोड रूपये इतकं आहे. पण रिलीजच्या आधीच सिनेमानं सॅटेलाईट आणि म्युझिक राईट्सदवारे 14 करोडचा गल्ला जमवला आहे.

close