नेवाळीजवळ नवी मुंबईचा एअरपोर्ट उभारा : खासदारांची मागणी

August 12, 2010 1:28 PM0 commentsViews: 7

12 ऑगस्ट

नवी मुंबई एअरपोर्टच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतंच चालल्या आहेत. नव्या एअरपोर्टसाठी ठाण्यातील शिवसेनेच्या खासदारांनी नव्या जागेचा आग्रह धरला. शिवसेना खासदारांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. नवी मुंबईला पर्याय म्हणून या खासदारांनी कल्याणजवळच्या नेवाळीचा पर्याय सुचवला आहे. यासाठी आनंद परांजपे, सुरेश टावरे आणि बळीराम जाधव हे खासदार आज नागरी उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल आणि पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांचीही भेट घेणार आहेत.

close