मल्टीप्लेक्समध्ये मनसेचा राडा

August 14, 2010 11:48 AM0 commentsViews: 2

14 ऑगस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट दाखवावे असा पवित्रा हाती घेतला आहे. काही दिवंसापूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी मल्टीफ्लेक्स मालकांना मराठी चित्रपट दाखवलेच पाहिजेत अन्यथा मनसे अद्दल घडवेल असा इशारा दिला होता. त्यानंतरही मल्टीप्लेक्स मालकांनी प्रतिसाद न दिल्याने आता मनसेने मल्टीफ्लेक्सच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे.

मुंबई, ठाणे आणि औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मल्टीप्लेक्सची मोठया प्रमाणात तोडफोड केली आहे. ठाण्याच्या इटर्निटी मॉलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी पिपली लाईव्हचे पोस्टर फाडले. ठाण्यातल्या आंदोलनाप्रकरणी मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष हरी माळी यांना पोस्टर फाडण्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्यासह 5 कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. मनसेच्या या आंदोलनानंतर ठाण्यातल्या सर्व मल्टिप्लेक्समध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दादरचा नक्षत्र मॉल, माहीमचं स्टारसिटी आणि कांदिवलीच्या सिनेमॅक्समध्येही मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तर अंधेरीत चकाला इथल्या संगम सिनेमात मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

औरंगाबादमध्ये थिएटर बंद पाडलं

औरंगाबादमध्येही मनसेने मराठी चित्रपट दाखवावे या मागणीसाठी अंजली बिग सिनेमा हे थिएटर मनसेने बंद पाडलं. यावेळी आंदोलन करणार्‍या मनसेच्या 10 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

close