उद्योगपती बी. जी. शिर्के कालवश

August 14, 2010 11:52 AM0 commentsViews: 4

14 ऑगस्ट

प्रसिद्ध उद्योगपती बी.जी. शिर्के यांचं पुण्यात शनिवारी निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. बी.जी. हे शिर्के उद्योगसमूहाचे संस्थापक होते. 1944 साली त्यांनी या उद्योगसमूहाची स्थापना केली होती. 2003 मध्ये पद्मश्री आणि सर विश्वेश्‍वरय्या पुरस्काराने बी. जी. शिर्के यांचा सन्मान करण्यात आला होता. तसेच 'क्रुसेडर' हे त्यांचं आत्मचरित्रचही प्रसिद्ध आहे.

बि.जी. शिर्के यांच्या निधनाबद्दल केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही बी. जी. शिर्के यांच्या कार्याबद्दल आठवणी जागवल्यात मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दु:ख व्यक्त केलंय.

close