गरीबांना मोफत धान्य : पवारांचं घुमजाव

August 14, 2010 4:59 PM0 commentsViews: 1

14 ऑगस्ट

धान्य सडण्यापेक्षा गरीबांना ते फुकट वाटा असा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला नसल्याचा दावा कृषी मंत्री शरद पवारांनी केला. दारिद्र्य रेषेच्या खालील जनतेला कोर्टाच्या आदेशानुसार कमी भावाने धान्य दिलं जातं असं स्पष्टीकरणही पवारांनी केलं.

काही दिवसापूर्वी शरद पवारांनी 'गव्हाचं नुकसान होतच असतं आताच नव्हे तर अनेक वर्षांपासून होतंय, त्यात विशेष काही नाही. आमच्याकडे अन्नधान्य ठेवण्यासाठी अपुरी गोदामं आहेत' असं प्रतिपादन कृषीमंत्री शरद पवार यांनी करुन खळबळ उडवली होती. यावर देशभरातून टिका झाली होती.

close