वाहनाच्या धडकेनं बछड्यांचा मृत्यू

August 17, 2010 1:10 PM0 commentsViews: 51

17 ऑगस्ट

नाशिकजवळ सिन्नर घोटी रस्त्यावर बिबट्यांच्या दोन बछड्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात एका बछड्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा बछडा गंभीर जखमी आहे. या बछड्यांचं वय अंदाजे दोन वर्षे असल्याचं समजतं. या घटनेची माहिती स्थानिक गावकर्‍यांनी इगतपुरीच्या वनाधिकार्‍यांना देऊनही कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने परिसरात रोष पसरला आहे. अखेर पोलिसांच्या गाडीतच जखमी बिबट्याला नाशिकच्या पशू रुग्णालयात नेण्यात आले आहे.

close