दिलीप वेंगसरकर यांनी पुण्यात स्थापन केली क्रिकेट अ‍ॅकडमी

October 24, 2008 1:41 PM0 commentsViews: 9

पुण्यातील थेरगाव इथं दिलीप वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकडमी स्थापन करण्यात आली आहे.या क्रिकेट अ‍ॅकडमीचे उदघाटन आज भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय वनडे टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांच्या उपस्थितीत झालं. या क्रिकेट अ‍ॅकडमीच्या उदघाटनाची घोषणा नुकतीच दिलीप वेंगसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. महाराष्ट्रातील सर्वसामान्य क्रिकेटपटूसाठी दिलीप वेंगसरकर यांनी ही अ‍ॅकॅडमी सुरू केलीय. स्वत: वेंगसरकर यांच्याकडून मुलांना क्रिकेटचं मोफत प्रशिक्षण मिळणार आहे.

close