रमझान आणि गणेशोत्सवात लोडशेडिंग नाही

August 18, 2010 2:05 PM0 commentsViews: 6

18 ऑगस्ट

रमझान आणि गणेशोत्सवाच्या काळात लोडशेडिंग केलं जाणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलीये. संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत होणार लोडशेडिंग रद्द केलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. ज्या भागातून लोडशेडिंग रद्द करण्याची मागणी होईल, तिथलं लोडशेडिंग रद्द केलं जाईल. तसंच मध्यरात्री बारा ते सकाळी सहापर्यंत लोडशेडिंग केलं जाणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलंय. मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

close