रिक्षा-टॅक्सी चलाओ मनसे !

August 18, 2010 2:13 PM0 commentsViews: 3

18 ऑगस्ट

मल्टिप्लेक्सनंतर आता मनसेनं आपली नजर रिक्षा आणि टॅक्सीवाल्याकडं वळवलीये. भाडं नाकारणार्‍या रिक्षा – टॅक्सीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावेत. आणि त्या अधिकार्‍यांचे नंबर्स त्यांच्या अधिकारक्षेत्रातल्या प्रत्येक रिक्षा आणि टॅक्सी स्टॅडवर लावावेत, अशी मागणी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीये. यासंदर्भात राज यांनी ट्रॅफिक विभागाचे जॉईंट कमिशनर विवेक फणसळकर यांची भेट घेतली. खोट्या आणि बनावट लायसन्स आणि परमिटवर मुंबई शहरात अनेक रिक्षा आणि टॅक्सी विनापरवाना चालत असल्याच्या मुद्द्याकडेही राज यांनी लक्ष वेधलं. त्यामुळे अशी रिक्षा किंवा टॅक्सी चालकांवर कारवाई व्हावी किंवा त्यांचे परवाने रद्द करावेत अशी मागणी राज यांनी केली आहे.

close