‘मोदी’ बचावसाठी भाजपचा अणुकराराला पाठिंबा

August 18, 2010 5:39 PM0 commentsViews: 1

18 ऑगस्ट

न्यूक्लिअर लायबिलिटी या विधेयकाला भाजपनं पाठिंबा दिला. पण भाजप आणि काँग्रेसच्या या एकीबद्दल लालूप्रसाद यादव यांनी गंभीर आरोप केला आहे. सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातून वाचवण्यासाठी भाजपनं काँग्रेसबरोबर डील केलं, असं लालूप्रसाद यादव यांचं म्हणणं आहे.

न्यूक्लिअर लायबिलिटी विधेयकावरून आज संसदेत मोठा गदारोळ झाला. या विधेयकाबद्दल भाजपनं काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यातच सोहराबुद्दीन शेख बनावट एन्काऊंटरप्रकरणी सीबीआयनं आजच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींंना क्लीन चीट दिली, अशी चर्चा आहे. यामुळंच काँग्रेस आणि भाजपचं संगनमत झाल्याचा आरोप लालूंनी केला.

close