साहित्य संमेलनाला निधी देण्यावरुन ठाणे पालिकेत वाद

August 19, 2010 12:40 PM0 commentsViews: 1

19 ऑगस्ट

ठाण्यात होणारं 84 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चार महिने आधीच वादात सापडलंय. या संमेलनाला महानगरपालिकेनं 1 कोटी रुपये द्यावेत असा प्रस्ताव शिवसेनेच्या एका नगरसेवकानं ठेवला होता. या प्रस्तावाला मित्र पक्ष असणार्‍या भाजपनेच विरोध केलाय. हा प्रस्ताव महानगरपालिकेचा नाही, असं स्पष्टीकरण महापौर अशोक वैतींनी दिलंय. पण या खर्चाचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंही याला कडाडून विरोध केलाय. हा पैसा ठाण्याच्या विकासासाठी वापरा, असं राजकीय पक्षांचं म्हणणं आहे.

close