माणिकराव हटावसाठी राणेंची मोर्चेबांधणी

August 19, 2010 1:13 PM0 commentsViews: 3

19 ऑगस्ट

माणिकराव हटाव मोहिमेला आता जोर आलाय. महसूलमंत्री नारायण राणे दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. माणिकरावांना हटवून प्रदेशाध्यक्षपदी पतंगराव कदम यांची वर्णी लावण्यासाठी राणे प्रयत्न करत असल्याचं समजतंय. नुकतचं काँग्रेस-राष्ट्रावादी समन्वय समितीवर नारायण राणे यांची वर्णी लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी सुचवलेल्या राधाकृष्ण विखे-पाटीलांचा पत्ता कट करत सोनिया गांधींनी नारायण राणेंना संधी दिली. त्यामुळं सध्या काँग्रेसमधल्या मुख्यमंत्री विरोधी गटात आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यपदी मुख्यमंत्री विरोधी गटातल्या नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्षपदासाठी आपलीच उमेदवारी भक्कम असून आपल्याला अजून राज्यातल्या सर्व नेत्यांचा पाठिंबा आहे असं माणिकराव ठाकरेंनी सांगितलं.

close