आशियाई फिल्म फेस्टिवलच्या समारोपात मराठी कलाकारांचा सत्कार

October 24, 2008 1:47 PM0 commentsViews: 5

6 व्या आशियाई फिल्म फेस्टिवलचा समारोप पुण्यात झाला. यावेळी नॅशनल अ‍ॅवॉर्डस् मिळवणा-या मराठी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. लगे रहो मुन्नाभाई मधील अभिनयाकरता दिलीप प्रभावळकर, शेवरीच्या निर्मितीसाठी नीना कुलकर्णी, अंतर्नादच्या संगीताकरता अशोक पत्की आणि सावलीच्या पार्श्वगायनाकरता आरती अंकलीकर-टिकेकर या पुरस्कार मिळालेल्या कलाकारांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला आशियाई फिल्म फेस्टीव्हलचे निमंत्रक मोहन आगाशे, कलाकार अरूण नलावडे, आशय फिल्म क्लबचे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव तसंच बरेच पुणेकर चित्रपट रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

close