कोर्टाचा निकाल येईपर्यंत फीवाढ स्थगित

August 19, 2010 1:33 PM0 commentsViews: 5

19 ऑगस्ट

पुण्यातल्या रोझरी शाळेनं फी वाढीला सध्यातरी स्थगिती दिली आहे. सध्या हे प्रकरण हायकोर्टात असल्याने त्यावर निकाल येईपर्यंत शाळा कुठलीही फीवाढ करणार नाही, असं शाळेच्या प्रशासनानं सांगितलं आहे.

पुण्यातल्या रोझरी शाळेनी फीवाढ मागे घेतली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा पालकांनी दिला होता. फीवाढीच्या विरोधात रोझरी शाळेनं हायकोर्टात अपील केलं होतं. त्यावर सुनावणी होईपर्यंत सरकारनं शाळेविरोधात कोणतीही कारवाई करु नये, असा अंतरिम आदेश हायकोर्टानं दिला आहे. त्याआधारेच पालकांनी 25 ऑगस्टपर्यंत फी भरावी अशी नोटीस शाळा प्रशासनाने बजावलीये. याविरोधात एकत्र येत पालकांनी गुरुवारी शाळेबाहेर आंदोलन केलं. यावेळी शाळेमध्ये चिल्लर फेकत शाळा प्रशासनाचा त्यांनी निषेध केला. ही फीवाढ जर संध्याकाळपर्यंत रद्द केली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा पालकांनी गुरुवारी दिला होता. शाळा प्रशासनानं आम्ही कोर्टाच्या आदेशांचं पालन करत असून कोर्टानं जर फी वाढ मागे घ्यायला लावली तरच आम्ही पैसे परत करु. मात्र आता पालकांना फी भरावीच लागेल अशी भूमिका घेतली आहे.

close