कोल्हापुरात शिवसैनिकांची तोडफोड

August 20, 2010 4:27 PM0 commentsViews: 2

20 ऑगस्ट

आयआरबीला विरोध करत शुक्रवारी कोल्हापुरात शिवसेनेने रस्ते विकास प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन केलं आणि आयआरबी कार्यालयाची तोडफोड केली. कोल्हापुरात आयआरबीने शहरात सुरु केलेल्या रस्त्यांची कामं अद्यापही पूर्ण झाली नाही त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी गंभीर अपघात होऊन आत्तापर्यंत 19 जणांचे बळी गेले आहेत.

गुरुवारी रुईकर कॉलनीजवळ सायकलने जाणार्‍या एका विद्यार्थिनीचाही ट्रकने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला होता. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज आयआरबी विरोधात आंदोलन केले.

close