नवी मुंबईत विमानतळ होणारच

August 20, 2010 4:32 PM0 commentsViews: 7

20 ऑगस्ट

नवी मुंबईत विमानतळ होणार की नाही होणार या वादाला आता नवीन वळण मिळालंय. नवी मुंबईचं विमानतळ प्रस्तावित जागीच होईल दुसर्‍या कुठल्याही ठिकाणावर विमानतळ होणार नाही, असं केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे. तर कल्याण, उरण, रेवस किंवा मांडवा इथं विमानतळ उभारण्याचा प्रश्नच नाही असंही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केलंय. नवी मुंबई एअरपोर्टच्या मुद्द्यावर दिल्लीत शुक्रवारी 2 तासांपेक्षा जास्त वेळ बैठक झाली. पण त्यात कोणताच निर्णय झाला नाही.

तज्ज्ञांनी नियोजित ठिकाणी एअरपोर्ट बांधण्यातल्या तांत्रिक अडचणी स्पष्ट केल्या. प्रदूषण डेटा, एअरपोर्टमुळे खारफुटींचं होणारं नुकसान यासारख्या मुद्द्यांवर समितीनं काही प्रश्न तयार केले आहेत. या प्रश्नांचं उत्तरं तयार करण्याच्या सूचना महाराष्ट्र सरकारला देण्यात आल्या आहे. त्यानंतर आणखी एक बैठक होणार आहे. कल्याणच्या पर्यायी जागेवरही यावेळी चर्चा करण्यात आली. पण ती भाभा अणुऊर्जा केंद्राच्या खूपच जवळ आहे. त्यामुळे त्याचा विचार बाजूला ठेवण्यात आला आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. यातून काही सकारात्मक बाबी निघण्याची शक्यता आहे, असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.

close