रिक्षाचालकांना मनसेचा चोप

August 20, 2010 5:27 PM0 commentsViews: 1

20 ऑगस्ट

जवळचं भाडं नाकारणार्‍या रिक्षाचालकांना मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात मारहाण केली. ठाणे रेल्वेस्टेशन परिसरात रिक्षाचालक जवळचं भाडं नाकारत असल्याच्या प्रवाश्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच रिक्षाचालकांना मारहाण करत मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षांच्या टायरची हवासुद्धा काढली. दोनच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या मुजोरीविरोधात कारवाईची मागणी केली होती.

close