आंदोलनात नुकसान करणार्‍या पक्षांकडून वसुली, वटहुकूम जारी

October 24, 2008 2:25 PM0 commentsViews: 4

24 ऑक्टोबर, मुंबईआंदोलनादरम्यान सरकारी आणि खाजगी मालमत्तेचं नुकसान करणार्‍या पक्षाकडून नुकसान भरपाई घेण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. सरकारनं यासंदर्भात वटहुकूम जारी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली. यात नुकसान करणार्‍यांना 25 हजार रुपये दंड आणि 6 महिने शिक्षेची तरतूद आहे. सध्या सरकारी मालमत्तेचं नुकसान करणार्‍यांना 2 हजार रुपयांचा दंड आणि 3 महिने शिक्षेची तरतूद आहे. या वटहुकुमला मान्यता मिळाल्यानंतर आता तातडीनं याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

close