विमानतळाच्या जमिनीत हितसंबध गुंतल्याचा ठाकरेंचा आरोप

August 21, 2010 2:12 PM0 commentsViews: 1

21 ऑगस्ट

नवी मुंबई विमानतळाच्या प्रस्तावित जागेत पटेलांचे हितसंबंध गुंतले असल्याचा आरोप शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलाय. नवी मुंबईचं विमानतळ प्रस्तावित जागीच होईल दुसर्‍या कुठल्याही ठिकाणावर विमानतळ होणार नाही, असं केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री प्रफुल पटेल यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं होतं.

पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून पटेल याच जागेसाठी आग्रह का धरतायत? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. आज महापौर निवासात झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.

close