जैतापूर अणूउर्जा प्रकल्पाची दोन महिन्यात सुरुवात

August 21, 2010 3:00 PM0 commentsViews: 3

21 ऑगस्ट

जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाचं काम येत्या दोन महिन्यात सुरू करणार असल्याचं न्युक्लीयर पॉवर कॉर्पोरेशनने स्पष्ट केलंय. NICILचे प्रकल्प संचालक सी बी जैन यांनी रत्नागिरीत ही माहिती दिली.या प्रकल्पाला आवश्यक असणारे पर्यावरण विषयक सर्व ना हरकत दाखले येत्या दोन महिन्यात मिळणार असून ग्रामस्थांनी विरोध न करता सनदशीर मार्गाने आंदोलन करून जमीनीच्या दराबाबत आपली मागणी मंजूर होण्यासाठी प्रयत्न करावेत असंही त्यांनी म्हटलंय. काही समाजकंटक ग्रामस्थांना भडकावून कायदा हातात घ्यायला लावताहेत. हे थांबले पाहिजे अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

close