सीमाप्रश्नी कर्नाटक मुख्यमंत्र्यांना गडकरीचं पत्र

August 21, 2010 3:02 PM0 commentsViews: 6

21 ऑगस्ट

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटाच्या शिष्ट मंडळांनी बेळगावात भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीनंतर सीमावासियांवर होणार्‍या अत्याचाराबद्दल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार असल्याचं गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.कोल्हापूरमध्ये झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत भाग घेण्यासाठी नितीन गडकरी बेळगावात आले होते. सीमावासियांवर होणारे अत्याचार कमी व्हावेत आणि भाषिक अल्पसंख्याक कायद्याची होणारी पायमल्ली थांबावी या मागणीसाठी आपण कर्नाटकचे मुख्यमंत्री येडुरीअप्पा यांना पत्र लिहिणार असल्याचं आश्वासन गडकरी यांनी दिलं. मात्र एकीकरण समितीच्याच दोन गटांमध्ये या आश्वासनामुळे मतभिन्नता निर्माण झाली. एन.डी.पाटील यांना हे आश्वासन आशादायी वाटतंय, तर किरण ठाकूर यांच्या गटाला आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृती करावी असं वाटत आहे

close