‘एक राखी सीमेवरील जवानांनासाठी’

August 21, 2010 3:13 PM0 commentsViews: 2

21 ऑगस्ट

कोल्हापूरातील स्वामी विवेकानंद ट्रस्टच्या वतीनं 'एक राखी सीमेवरील जवानांनासाठी' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बहिण-भावाच्या नात्याचं प्रतिक म्हणून आपण रक्षाबंधन हा सण साजरा करतो. मात्र सीमेवर लढणार्‍या जवानांना रक्षाबंधनासाठी गावी येणं शक्य नसतं. त्यामुळे जवानांनाही रक्षाबंंधन साजरा करता यावा म्हणून विवेकानंद ट्रस्टने या राख्या संकलित केल्या आहेत. शाहू स्मारक इथं झालेल्या या कार्यक्रमात कोल्हापूरातील जवानांना विद्यार्थीनींनी राख्या बांधल्या . यावेळी ट्रस्टने जमा केलेल्या 6 हजार राख्या सीमेवरील जवानांना पाठविण्यात आल्या. यावेळी भारतीय सेनेतील हे जवान भावुक झाले होते.

close