स्टेपमॉम सिनेमाचा रिमेक ‘वुई आर फॅमिली’

August 21, 2010 3:35 PM0 commentsViews: 6

21 ऑगस्ट

'स्टेपमॉम' या सिनेमाचा हिंदी रिमेक असलेला 'वी आर फॅमिली' हा सिनेमा लवकरच पडद्यावर पहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अभिनेता अर्जुन रामपालने एका रेडिओ स्टेशनला भेट दिली. वुई आर फॅमिली हा सिनेमा 2 सप्टेंबरला रिलीज होत आहे. हा सिनेमा स्टेपमॉम या सिनेमाचा रिमेक आहे. काजोल, करिना कपूर आणि अर्जून रामपाल या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाच्या प्रमोशनसाठी अर्जून रामपाल एका रेडीओ स्टेशनमध्ये दिसला..पण सिनेमातल्या महिल्या मात्र गैरहजर होत्या हे विशेष. माझ्या मते वुई आर फॅमिली हा सिनेमा अपेक्षा वाढवणारा आहे. मी स्टेपमॉम पाहिलाय. पण वुई आर फॅमिली तंतोतंत त्याच्यासारखा नाही. काही बदल निश्चित करण्यात आले आहे, असे अर्जून रामपालने सांगितलं.

close