राज ठाकरेंवरील सुनावणी आता 11 नोव्हेंबरला

October 24, 2008 2:31 PM0 commentsViews: 7

24ऑक्टोबर, कल्याणपरप्रांतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर कल्याण कोर्टात दाखल असलेल्या खटल्याची सुनावणी आता 11 नोव्हेंबरला होणार आहे. तोपर्यंत राज ठाकरे जामिनावर राहणार आहेत. सरकारी वकील अ‍ॅड. रोहिणी सॅलियन आणि अ‍ॅड. राजन शिरोडकर उपस्थित होते. ' याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून कोर्टात बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ हवा, असं अ‍ॅड. रोहिणी सॅलियन यांनी न्यायाधीशांना सांगितलं. न्यायाधीशांनी मागणी मान्य करत पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला होईल, असं सांगितलं. त्या सुनावणीत राज यांना हजर राहण्याची गरज नाही पण पुढील सुनावणीला हजर राहायचं की नाही, याबाबत 11 नोव्हेंबरला निर्णय घेण्यात येईल, असं न्यायाधीशांनी सांगितलं.

close