पुण्यात फी वाढीविरोधात आंदोलन तीव्र

August 23, 2010 11:12 AM0 commentsViews: 4

23 ऑगस्ट

पुण्यातल्या खासगी शाळेच्या पालकांनी शाळेच्या मनमानी फीवाढीविरोधात मोर्चा काढला. रोझरीच्या कॅम्प शाखेपासुन हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी पालकांनी पालिकेचे सह-आयुक्तांची भेट घेतली. रोझरी इंटरनॅशनल स्कूलने शिक्षक पालक सभेची स्थापना केलेली नाही. पालकांना विश्वासात न घेता त्यांनी फीवाढ केली. परिणामी या मनमानी कारभारला पालकांनी विरोध केला. शाळेने फीवाढ मागे घ्यावी, यासाठी पालकांनी मोठं आंदोलन उभारले.

पण शाळा फीवाढ रद्द करायला तयार नाही. पुण्याच्या शिक्षण उपसंचालकांनीही यात मध्यस्थी करत पालक, शाळा व्यवस्थापनयांची बैठक घेतली. शुक्रवारी झालेल्या या बैठकीत फीवाढ मागे घेण्यात आली होती. पण आता पुन्हा रोझरीने वाढीव फी 25 ऑगस्टपर्यंत भरावी, अशी नोटीस पालकांना विद्यार्थ्यांकरवी पाठवली. त्यामुळेच रोझरीच्या पालकांनी हे आंदोलन पुकारलं. फीवाढीला वैतागलेले इतर दहा खासगी शाळांचे पालकही यात सहभागी झाले होते. या सर्व पालकांनी आता शहर-पालक संघटनेची स्थापना केली आहे.

close