राज्यातली औष्णिक वीजनिर्मिती निम्म्यावर

August 25, 2010 10:29 AM0 commentsViews: 14

25 ऑगस्ट

राज्यातली औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातलं उत्पादन निम्म्यावर आली आहे. खराब कोळशाच्या पुरवठ्यामुळे 7200 मेगावॅटवरून वीजनिर्मिती 3600वर आली आहे. त्यामुळे राज्यात लोडशेडिंग वाढण्याची शक्यता आहे. औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला होणारा कोळशाचा पुरवठा कोल इंडिया लिमिटेड आणि वेस्टर्न कोल फिल्ड या सरकारी कंपन्यांकडून होतो. उमरेड कोळसा खाणीतून मोठ्या प्रमाणावर राज्यातल्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना कोळसा पुरवला जातो. पण खराब कोळशामुळे वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. 'महाजनको'च्या 36 वीजनिर्मिती केंद्रांना या खराब कोळशाच्या पुरवठ्याचा फटका बसला आहे. उत्तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं वीजनिर्मिती केंद्र असलेल्या दीपनगरमध्येही वीजनिर्मिती ही घसरली आहे. इथल्या 26 संचांपैकी 9 संच अजूनही बंद आहेत.

महाजनकोच्या फक्त दिपनगरंच नाही राज्यातील 36 वीज निर्मीती केन्द्रांना या खराब कोळश्याचा फटका बसला आहे.सध्या कोळश्यापासून राज्यांत वीज 7200 मेगावॅट वीजेचं उत्पादन केलं जातं. पण कोल इंडिया कडून आलेल्या खराब कोळश्यामुळे राज्यांत 3600 मेगावॅट वीजेचं उत्पादन होतंय. क्षमतेच्या 50 टक्क्यापर्यंत हे उत्पादन घसरल्यानं लोडशेडिंग वाढिव फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसण्यास सुरुवात झाली आहे.

close