‘ ओपेक ‘ क्रूड तेलाचं उत्पादन कमी करणार

October 24, 2008 2:38 PM0 commentsViews: 6

24ऑक्टोबरतेल उत्पादकांची ' ओपेक ' ही संघटना दर दिवशीचं क्रूड तेलाचं उत्पादन 15 लाख बँरलनं कमी करणार आहे. ' ओपेक ' च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं आता पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता झाली आहे. पेट्रोलिअम मंत्री मुरली देवरा यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार असल्याचं संकेत दिले होते. मात्र हा निर्णय ओपेकच्या निर्णयावर अवलंबून असल्यांचही त्यांनी म्हटलं होतं. क्रूड तेलाच्या किमती सध्या दीडशे डॉलर्स प्रति बँरल्सपर्यंत खाली आल्या आहेत. त्यामुळं किमतीत होणारी ही घट कमी करण्यासाठी ओपेकनं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

close