केईएमचं आंदोलन मागे

August 25, 2010 10:36 AM0 commentsViews: 2

25 ऑगस्ट

केईएमच्या डॉक्टरांनी काम बंद आंदोलन मागे घेतले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी डॉक्टरांना मारहाण केली. मेडिसीन वॉर्डमध्ये ही मारहाण करण्यात आली होती.त्यानंतर आज काम बंद आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला होता. पण डॉक्टरांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर, डॉक्टरांनी हे आंदोलन मागे घेतलं. डीन संजय ओक यांनी एका महिन्यात हॉस्पिटलचं सुरक्षा वाढवण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.

close