लवासा प्रकरण : दलालांमार्फत बळकावल्या जमिनी

August 25, 2010 10:51 AM0 commentsViews: 5

25 ऑगस्ट

लवासा प्रकल्पात आदिवाशींची जमीन अर्थात ट्रायबल लॅण्ड घेतली नसल्याचा दावा लवासा कार्पोरेशननं केला. पण लवासाकडे आदिवाशींची 93 हेक्टर म्हणजे 232.5 एकर जमीन असल्याचा ठपका खुद्द महसूल विभागानं ठेवला आहे. प्रत्यक्षात आयबीएन-लोकमतच्या हाती असलेल्या पुराव्यानुसार, लवाासानं दलालांच्या माध्यामातून आदिवाशींची शेकडो एकर जमीन बळकावली आहे. एकट्या मुगावमध्ये 67 आदिवासी कुटुंबियांची 330 एकर जमीन लवासानं हिसकावल्याचं सिद्ध झालं आहे.

मुळशी तालुक्यातला हा डोंगराळ पट्टा लव्हासा प्रकल्पाचा मुख्य भाग आहे. मुगाव आणि आजुबाजूच्या परिसरात आदिवाशांना पैशाचं आमिष दाखवून, तर कधी जोर जबरदस्तीनं दलालांनी जमिनी आपल्या नावांवर करून घेतल्या एकरी 500 ते 5000 हजार रुपये दरानं निरक्षर आदिवाशांकडून शेकडो एकर जमिनी घेण्यात आल्या. लव्हासानं हरप्रकारे छळवाद मांडून आदिवाशांची जमिनी अक्षरशः लुटल्याचा आरोप होत आहे.

प्रत्यक्षात लवासा कार्पोरेशननं या जमिनी दलालांमार्फत बळकावल्या आहेत. त्यामुळंच आपण आदिवाशींची एक इंचही जमीन घेतली नसल्याचा दावा लवासा कार्पोरेशन करतं आहे. पण लवासाचा सगळा बेबनाव उघड झाला आहे. त्यामुळं खंर काय हे जनतेला सगळं कळलं आहे.

close