वाळू माफियांविरोधात पालघरमध्ये आंदोलन

August 25, 2010 11:12 AM0 commentsViews: 3

25 ऑगस्ट

अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्‍या ट्रकचे टायर पंक्चर करून, टायरमधील हवाच काढून टाकण्याचं इशारेवजा आंदोलन पालघर तालुक्यातल्या नारंगीच्या गावकर्‍यांनी केलं. वाळूउपशास बंदी असतानाही सक्शन पंपाचा वापर करत लाखो टन रेती काढुन त्याची सर्रास वाहतूक सुरू होती. पालघरमधील कोशिदे, खारडी, वैतरणा, हनीवडे या ठिकाणाहून हा बेसुमार रेतीउपसा चालतो. पण प्रशासनही त्याकडे दुर्लक्ष करते परिणामी प्रशासन आणि वाळू माफियांच्या संगनमतानंच ही चोरी होत आहे, असा आरोप गावकर्‍यांचा केला आहे. अखेर संतापलेल्या गावकर्‍यंानी 50 ट्रक आणि डंपरमधील हवा काढून अनोखं आंदोलन केलं आणि 181 ट्रकवर कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडलं. उशिरा पोहोचलेल्या पोलिसांनी मात्र कारवाईबाबत बोलण्यास नकार दिला.

close