लाल महालातून दादोजींचा पुतळा हलवणार

August 25, 2010 2:56 PM0 commentsViews: 1

25 ऑगस्ट

पुण्यातल्या ऐतिहासिक लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा अखेर हलवला जाणार आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत हा पुतळा हलवला जाईल, असं आश्‍वासन पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी दिलंय. आज लोकशासन आंदोलन समितीच्या वतीनं लाल महालात असलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवावा या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत आणि बी.जी. कोळसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनानंतर महापौरांनी त्या ठिकाणी जाऊन ही घोषणा केली.

close