भारताचा न्यूझीलंडवर विजय

August 25, 2010 5:01 PM0 commentsViews: 1

25 ऑगस्ट

दम्बुला वन डेत भारतानं न्यूझीलंडचा 105 रन्सनं दणदणीत पराभव करत ट्राय सीरिजच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलमध्ये आता येत्या शनिवारी भारताची गाठ यजमान श्रीलंकेशी पडणार आहे. भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 224 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. पण न्यूझीलंडची टीम अवघ्या 118 रन्समध्ये आटोपली.

भारताच्या भेदक बॉलिंगसमोर न्यूझीलंडची टॉप ऑर्डर झटपट कोसळली. मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये प्रवीणकुमारनं मार्टिन गुप्टिलची विकेट घेत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. या धक्क्यातून न्यूझीलंडची टीम मग सावरलीच नाही. अवघ्या 42 रन्समध्ये न्यूझीलंडचे 6 बॅट्समन पॅव्हेलिअनमध्ये परतले. त्याआधी वीरेंद्र सेहगावच्या शानदार सेंच्युरीच्या जोरावर भारतानं 223 रन्स केले. भारताची टॉप ऑर्डर पुन्हा फ्लॉप ठरली. पण सेहवागनं एकाकी झुंज देत 110 रन्सची खेळी केली.

close