दादोंजींचा पुतळा हलवण्याचा निर्णय लांबणीवर

August 26, 2010 10:41 AM0 commentsViews: 1

26 ऑगस्ट

लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. लोकशासन समितीच्या ठिय्या आंदोलनानंतर पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी बुधवारी पुतळा हटवण्याची घोषणा केली होती. मात्र आता सर्वपक्षीय बैठकीनंतर महापौरांनी यु टर्न घेत हा निर्णय पुढे ढकलल्याचं सांगितलंय.

गुरुवारी महानगरपालिकेत सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यासाठी आपण एक समिती नेमू आणि या समितीच्या अहवालानंतर यावर कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलंय. त्यामुळे आता दादोजींचा पुतळा हटवण्याची मागणी लांबणीवर पडला आहे. महापालिकेच्या या निर्णयानंतर संतापलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी महापौरांच्या दालनाबाहेर सुरक्षारक्षकास धक्काबुक्की केली.

शिवसेनेचा विरोध

दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवण्याला शिवसेना कार्यध्यक्ष उद्धव ठाकरेंनी विरोध केला आहे. दादोजींप्रकरणी जातीय रंग देणार्‍यांना शिवाजी महाराज कधी कळलेच नाहीत असं उद्धव ठाकरे म्हणालेत दादोजी यांचा पुतळा हटवण्याचा निर्णय दुदैर्वी असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्याठिकाणी शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचा पुतळा लावा असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

close