नागपूरच्या विस्फोटक विभागाने प्रसिद्ध केली फटाक्यांबाबतची आचारसंहिता

October 24, 2008 3:30 PM0 commentsViews: 30

दिवाळी म्हणजे फटाक्यांची आतशबाजी. दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाने प्रदूषण आणि दुर्घटनाही होतात. म्हणूनच फटाके फोडतांना काही गोष्टीं लक्षात ठेवणं गरजेच असतं. कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी या सगळ्यांची माहिती विस्फोटक विभाग प्रकाशित करते. नागपूरच्याही विस्फोटक विभागाने दिवाळीचे फटाके फोडताना कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. विस्फोटक विभाग ठरवतो की कोणते फटाके फोडायचे आणि कोणते नाही. मुख्य नियंत्रक अधिकारी, विस्फोटक विभाग- अजय निगम सांगतात, रात्री सहा ते दहा यावेळेत फटाके वाजवू नका. कोणते फटाके फोडावेत, फोडू नये याबाबत प्रत्येक शहाराच्या काही मर्यादा आहेत. नागपूर शहरात 125 डेसिबल इतक्याच आवाजाचे फटाके फोडावेत.त्याचप्रमाणे घरात फटाके फोडू नये, मोकळ्या जागेत फोडावे, खराब फटाक्यांचा उपयोग करू नये याबाबत लोकांना माहिती देतात.125 डेसिबल पेक्षा कमी आवाज करणारे अनेक फॅन्सी पटाके बाजारात आले आहेत. तसंच प्रत्येक फटाक्यांच्या डब्यावरती वॉरनिंगही लिहिली आहे. जुन्या फटाक्याची जागा आता नवीन फटाक्यांनी घेतली आहे. या नवीन फटाक्यांचा आवाज तर कमी असतोच पण यांच्या वेगवेगळ्या रंगांमुळे लोकांनाही ते आवडतात. सगळ्यांनी जर फटाके फोडतांना नियमांच पालन केलं तर दुर्घटना होणार नाही आणि ही दिवाळी सगळ्यांची सुखा समाधानाची जाईल, यात शंकाच नाही.

close