नवी मुंबईत 543 इमारतींना ओसी नाही

August 26, 2010 1:22 PM0 commentsViews: 3

26 ऑगस्ट

नवी मुंबईत बुधवारी तीन मजली बिल्डिंग कोसळून दोघांचा मृत्यू झाला. 1 सप्टेंबरला या इमारतीच्या घरांचा ताबा घर मालकांना दिला जाणार होता. त्यापूर्वीच ही इमारत जमीनदोस्त झाली. या इमारतीचे ऑक्युपेशन सर्टिफिकट घेतलं नव्हतं. पण अशाच प्रकारे शहरात 543 इमारतींना ऑक्युपेशन सर्टिफिकट नसल्याचं आता समोर आलं आहे.

ग्रामस्थांकडून साडेबारा टक्क्यांचे भूखंड घ्यायचा आणि त्याचा विकास करायचा अशा प्रकारे शहरातील इस्टेट एजन्ट, दुकानदार, एवढंच नव्हे तर किराणा दुकानदारही नवी मुंबईत बिल्डर झालेत. बिल्डिंग उभारण्याचा कोणताही अनुभव पाठीशी नसतानाही शहरात मोठ्या प्रमाणावर छोट्या बिल्डिंग उभ्या राहू लागल्यात. खरं तर बिल्डर बरोबरच स्ट्रक्चरल इंजिनियर आणि आर्किटेक्ट हा जबाबदार घटक आहेत. पण ही सर्व मंडळी फक्त बांधकाम परवानगी घेवून बांधकाम सुरू करतात. पण इमारतीचा पाया पूर्ण झाल्यानंतरची परवानगी घेत नसल्याने अशा घटना होत असल्याचं पुढे आलं आहे.

आपण घर कोणाकडून घेतोय त्याचे स्ट्रक्चरल इंजिनियर आणि आर्किटेक्ट कोण आहेत, सर्व परवानग्या घेतल्या गेल्यात का, याची शहानिशा घर घेणार्‍यांनी करणे गरजेचे आहे. नाहीतर अशा दुर्घटना घडल्या तर जीव सामान्यांचाच जाणार आहे.

close