नागपूरमध्ये 220 स्टार बसेस धुळखात

August 26, 2010 1:51 PM0 commentsViews: 5

26 ऑगस्ट

केंद्र सरकारनं नागपूरला 220 स्टार बसेस दिल्या होत्या पण आज आठ महिने उलटून गेल्यावरही या सर्व बसेस धुळखात आहेत. नागपूर महानगरपालिकेमध्ये सेना भाजपची सत्ता आहे. दोन वर्षापूर्वी शहर बस चालवण्याचं कंत्राट वंश इन्फ्रा या कंपनीला दिलं होतं. यात या कंपनीनं 200 बसेस शहरात सुरू केल्या, पण केंद ्रसरकारकडून आलेल्या या बसेस या कंपनीला चालवायला द्यायच्या आहेत. यासाठी 36 कोटी रूपये कंपनी मनपाला देणार आहे. महापालिका आणि कंपनीच्या वादात या सर्व बसेस गेल्या अनेक महिन्यापासून शहराबाहेर पडून आहेत. अनेक बसेसचे टायर्स चोरीला गेले आहेत तर बसेस उभ्या असलेल्या जागेवर झाडं वाढली आहेत.

close