हमसफरची ’68 पेजेस्’

August 26, 2010 1:58 PM0 commentsViews: 38

26 ऑगस्ट

तृतीयपंथी आणि समलैंगिकांच्या आयुष्यावर आधारीत 68 पेजेस् ही शॉर्ट फिल्म बुधवारी मुंबईत वांद्रे इथं रिलीज झाली. हमसफर ही संस्था गेली 16 वर्ष समलैंगिकांच्या प्रश्नांवर काम करते. या संस्थेनं या आधीही ब्रीजेस ऑफ होप आणि द राईट वे या दोन फिल्मस्‌द्वारे समलैंगिकांचं जग कॅमेर्‍याच्या माध्यमातून दाखवलं होतं. '68 पेजेस' या 90 मिनीटांच्या फिल्ममध्ये बारमध्ये काम करणारी, ड्रग्ज ऍडिक्ट, HIV ग्रस्त आणि वैश्या व्यवसाय करणार्‍या चौघांची दुनिया एका कौन्सिलरच्या नजरेतून आपल्याला दिसते. या सिनेमा प्रदर्शनाबरोबरच कलम 377 मधील तरतुदींवर मार्गदर्शन करण्यासाठी चर्चासत्रही आयोजीत केलं होतं. ज्यात अनेक कॉलेज विद्यार्थी सहभागी झाले होते. हमसफरचे कौंन्सिलर प्रिती प्रभूघाटे आणि फिल्मचे दिग्दर्शक श्रीधर रंगायन हेही या चर्चासत्रात सामील झाले होते.

close