कुपोषण रोखण्यासाठी पाचपुतेंचा अजब उपाय

August 26, 2010 2:17 PM0 commentsViews: 63

26 ऑगस्ट

अहमदनगर जिल्ह्यातलं कुपोषण थांबवण्यासाठी, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी अनोखी शक्कल काढली आहे. यानंतर लग्नाची पत्रिका छापण्यापूर्वी, तहसिलदारांची परवानगी घ्यावी लागणार असल्याचं बबनराव पाचपुते यांनी सांगितलं आहे. आदिवासी भागात कुपोषणाला बालविवाहच, जबाबदार असल्याचं मत पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केलं आहे. यापुढे लग्नपत्रिका छापण्यापूर्वी तहसीलदारांची परवानगी घ्यावी असा नवा फतवा त्यांनी काढला आहे. आणि त्याच्या कडक अंमलबजावणीचे आदेशही जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. मुळातच शहरातील तहसील कार्यालयामध्ये विविध दाखल्यांसाठी नेहमीच रांगा असतात. याचाच फायदा घेत या कार्यालयामध्ये गैरव्यवहारांचे प्रकारही घडतात. यातच त्यांच्यासाठी नवीन पुरण उघडुन दिल्याची चर्चा पुढे येत आहे. या निर्णयाला काही संघटनांनी आणि कायदेतज्ञांनी कडाडून विरोध केला आहे.

close