चिरेखाणीत टाकली 100 टन राख

August 26, 2010 2:32 PM0 commentsViews: 2

26 ऑगस्ट

रत्नागिरीत फिनोलेक्स कंपनीचा PVC प्रकल्प आहे. ही कंपनी उत्पादनासोबत स्वत:साठी विजनिर्मितीही करते. त्यांच्या औष्णिक – वीज प्रकल्पातुन तयार झालेली 100 टन राख गुहागर तालुक्यातल्या पाचारे गावातल्या चिरेखाणीत टाकल्याचं उघड झाले आहे. ही बाब प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर प्रदुषण मंडळानंही याला आक्षेप घेतला आहे. मात्र पर्यावरण विभागाच्या सुचनेप्रमाणे अशी राख चिरेखाणी बुजवण्यास वापरायला हरकत नाही असं फिलोलेक्सच्या व्यवस्थापनानं स्पष्ट केल आहे. रत्नागिरीतल्या पर्यावरण अभ्यासकांनी मात्र यावर तीव्र आक्षेप नोंदवला असुन असा प्रकार पुन्हा झाल्यास कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.फिनोलेक्स गुहागर इथल्या पाचरे गावातील चिरा खाणीत टाकलेली राख आठ दिवसात न उचलल्यास फिनोलेक्सची वीज आणि पाणी कापण्याचा इशारा प्रदुषण नियंत्रण मंडळानं दिला आहे.

close