दोन लाखांपर्यंत उत्पन्न होणार करमुक्त

August 26, 2010 4:17 PM0 commentsViews: 4

26 ऑगस्ट

कॅबिनेटने डायरेक्ट टॅक्स कोडला मंजुरी दिली आहे. यामुळे कराच्या रचनेमध्ये बदल होणार आहेत.सध्या करदात्याचं 1.60 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे. आता ही मर्यादा 2 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 2 ते 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर आता 10 टक्क्यांनी कर भरावा लागेल, तर 5 ते 10 लाखावर 20 टक्के तसंच 10लाखांच्या वरच्या उत्पन्नावर 30 टक्क्यांनी कर भरावा लागेल. कॉर्पोरेट टॅक्सही आता 30 टक्के करण्यात आला आहे. टॅक्सच्या रचनेत असणार्‍या पळवाटा कमी करून जास्तीत जास्त कंपन्या आणि व्यक्तींना टॅक्स प्रणालीत आणण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेेत. हा नवा टॅक्स कोड एप्रिल 2011 पासून लागू होईल.

नवीन टॅक्स कोड

2 लाखापर्यंत करमुक्त2 – 5 लाख – 10%5 – 10 लाख – 20%10 लाखांच्या वर – 30% कॉर्पोरेट टॅक्स – 30%

close