मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंगसह दोन आरोपींवर गुन्हा दाखल

October 24, 2008 4:42 PM0 commentsViews:

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंगसह इतर दोन आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या आरोपींना तीन नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीही देण्यात आली आहे. मालेगावमध्ये जे बॉम्बस्फोट झाले त्या बॉम्बस्फोटांमागचे खरे सूत्रधार हिंदू जागरण मंचाचे कार्यकर्ते होते हे आता स्पष्ट झालं आहे. रमझानच्या पवित्र महिन्यात 29 सप्टेंबर 2008 ला रात्री 9:30च्या सुमाराला मालेगावातील नुराणी मस्जिद परिसरात स्फोट झाला. स्फोटासाठी एमएच -15 4572 या नंबरच्याएलएमएल फ्रिडम या मोटर सायकलचा वापर करण्यात आला होता. या स्फोटात 5 जण ठार झाले तर 40 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.

close