दिल्लीत शेतकर्‍यांनी केला मायावतींचा विरोध

August 26, 2010 4:25 PM0 commentsViews:

26 ऑगस्ट

उत्तरप्रदेशात मायावतींनी आणलेल्या यमुना एक्सप्रेसवे प्रकल्पाच्या विरोधात तिथल्या शेतकर्‍यांनी दिल्लीत येऊन निदर्शनं केली. या प्रकल्पासाठी शेतकर्‍यांची जी जमीन संपादित केली गेली. त्यासाठी त्यांना आणखीन अधिक भरपाई हवी आहे. अलिगढ, मेरठ, आणि बुलंदशहर भागातून हजारो शेतकरी दिल्लीत रामलीला मैदानावरुन एकत्र जमले होते. त्याठिकाणी त्यांनी या प्रकल्पाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मायावतींचा निषेध केला. शेतकर्‍यांच्या रॅलीला राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंग, भाजपचे काही नेते, आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनी मार्गदर्शन केलं. पण या निदर्शनाचा परिणाम दिल्लीतल्या वाहतूक व्यवस्थेवर दिसून आला. त्यामुळं ऐन संध्याकाळच्या वेळी दिल्लीतल्या प्रमुख रस्त्यांवरचं ट्रॅफिक जाम झालं होतं.

close